Share

५० टक्के कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ न दिल्यास कंपन्यांवर होणार कारवाई

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 47 वर पोहोचला आहे. मुंबई आणि उल्हासनगर इथे कोरोना पॉझिटिव्ह नवे रुग्ण आढळले आहेत. एकट्या पुण्यात कोरोनाचे 19 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबईतील सर्व कंपन्यांना त्यांच्या ५० टक्के कर्माचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा नियम लागू करण्याचे निर्देश दिले होते. आदेश न पाळल्यास या कंपनीविरोधात आयपीसी कलम १८८ अंतर्गत दंडात्मक कारवाई होऊ शकते,’ असा इशारा मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिला आहे.

तसेच मात्र ज्या कंपन्या या नियमाची अंमलबजावणी करणार नाहीत अशा कंपनीविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई प्रवीण परदेशी यांनी दिला आहे. तसेच पुढील १ ते २ दिवसात मुंबईतील कंपन्यांची तपासणी केली जाईल, असे देखील सांगितले.

दरम्यान, मुंबईतल्या ज्या कंपन्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देत नसतील, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचा इशाराच आता आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिला. ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने खाजगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!