Share

बापरे ! गाव गाठण्यासाठी चंद्रपूरचा ‘ हा ‘ युवक चक्क ८०० किमी चालत आला

Published On: 

🕒 1 min read

चंद्रपूर : जगभरात कोरोना पसरत आहे . देशात गेली कित्येक दिवस लॉक डाऊन आहे. चंद्रपूर शहरातील अजय सातोकर नामक युवकाची कथा लॉकडाऊनचे भय सांगणारी ठरली आहे.

मार्चच्या मध्यात कोरोना संकट जगाला कवेत घेईल हे नक्की झाले होते. त्यानंतर देशाच्या विविध भागातील कामगार व मजूरवर्ग रोजगार बुडण्याच्या भीतीने ग्रासला होता. चंद्रपूर शहरातील पठाणपुरा भागात राहणारा अजय सातोकर हा युवक रायगड जिल्ह्यातील पनवेलच्या ‘ ऍमिटी युनिव्हर्सिटी’त संगणक चालक म्हणून नोकरीत होता. लॉकडाऊनच्या काळात पगार संपला आणि खिशात 300 रुपये उरले असताना आता गावाकडे परतायचे असा निश्चय करत त्याने पनवेल सोडले.

चंद्रपूरला येण्यासाठी कुठलीही गाडी नसल्याने त्यांने हा प्रवास पायदळ सुरू केला. पनवेल – पुणे – नगर – यवतमाळ – वणी मार्गे तो चंद्रपूर जिल्ह्यात पोचला. चंद्रपूर शहराच्या आधी २५ किलोमीटर असलेल्या औद्योगिक शहर घुग्गुस येथे तो १६ एप्रिल रोजी पोहोचला. यातील सुमारे १५० किलोमीटर चा प्रवास त्याला रुग्णवाहिका अथवा एखाद्या दुचाकीवर बसून करता आला. मात्र ८०० किलोमीटरचा त्याचा प्रवास पायीच झाला.

गावकुसाबाहेर ढाब्यावर झोपणे, मिळेल ते खाणे असा त्याचा प्रवास होता. मध्येच लागलेल्या एखाद्या नदीत अंघोळ करून अंधार होण्याच्या आत एखाद्या शहरात तो मुक्काम करायचा. गावाकडे जाण्याची ओढ आणि रिकामा खिसा.पण यातून पायी जाण्याचा मार्ग दिसला आणि यामुळे सर्व अडचणी दूर झाल्या.

जिल्हाबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस नाक्यावर पोलिसांनी त्याला अडवले.तातडीने त्याला रुग्णालयात तपासणी करून पोलिस ठाण्यात त्याची माहिती नोंदवून घेण्यात आली. सध्या घुग्गुस शहरातच त्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे.

लॉकडाऊन ची धास्ती आणि कोरोनाचे संकट झेलत गाव गाठणा-या अजयने जिद्दीत जीवघेण्या कोरोनाला देखील मात दिली.असेच यावरून म्हणता येईल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!