Share

‘दिशा’ साठी दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलविणार : अनिल देशमुख

Published On: 

मुंबई : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आंध्र प्रदेशातील दिशा कायदा लवकरच महाराष्ट्रातही लागू करण्यात येणार आहे. विधानमंडळाचे अधिवेशन संपण्याअगोदर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने केलेल्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन कायदा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच या कायद्यासाठी एक स्वतंत्र समितीही गठीत करण्यात आली होती.

मात्र जगभरात हाहाकार माजविलेल्या कोरोना व्हायरसने भारतातही शिरकाव केला. त्यानंतर देशभरातील अनेक महत्त्वाच्या निर्णयाप्रमानेच याही निर्णयाला ब्रेक लागला. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधिवेशनात विशेष अधिवेशन घेण्याची विनंती केली आहे. कोरोनाच्या समस्येमुळे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठीचे नवीन विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणे शक्य न झाल्याने त्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याची विनंती अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

 

दरम्यान, दिशा कायदा महाराष्ट्रात करण्यासाठी आणि अधिक सुधारित स्वरूपात लागू करण्यासाठी वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी दोरजे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.आरोपींना तातडीने आणि कठोर शिक्षा करण्यासंदर्भात आंध्रप्रदेश सरकारने केलेल्या दिशा कायद्याच्या धर्तीवर राज्यात हा दिशा कायदा लागू करण्यात येणार आहे. . दिशा सारखा कायदा आणण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याचं काम हा कायदा करेल.’

आंध्रप्रदेश विधानसभेत ‘दिशा विधेयक’ मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार बलात्कार प्रकरणात 21 दिवसांत निकाल लावला जाईल आणि दोषी आढळल्यास त्याला फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या नव्या कायद्याला ‘आंध्रप्रदेश दिशा गुन्हे कायदा 2019’ असे नाव देण्यात आले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!