🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने अनेक चित्रपटांमध्ये काम केल आहे. आपल्या अभियानाने आणि सौंदर्याने तिने अनेकाना घायाळ केल आहे. सध्या ती चित्रपटांपासून लांब दिसत असली तरी सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या वक्तव्यांमुळं ती अनेकदा चर्चेत असते. यामुळं अनेकदा तिला ट्रोल करण्यात येतं. सध्या कोरोनाचा काळ असल्याने अनेक सेलिब्रिटी आपला वेळ कुटुंबासोबत व्यतित करत आहे. ट्विंकल देखील आपल्या मुलासोबत वेळ देत आहे. यावेळी एक पोस्ट ट्विंकलने शेअर केली असून तिच्या लेकीने तिला एक अनोखी शिक्षा दिली आहे.
https://www.instagram.com/p/CPZ8-JHpO9X/?utm_source=ig_embed&ig_rid=ae079ff2-4691-4a96-b451-004bc0731769
ट्विंकलची मुलगी नितारा हिला मेकअप करण्याची भरपुर हौस आहे. संधी मिळताच ती आपल्या आईसोबत मेकअप आर्टिस्ट हा खेळ खेळते. यावेळी देखील तिनं नेहमीप्रमाणेच ट्विंकलचा विचित्र मेकअप केला. तो फोटो ट्विंकलनं इन्स्टाग्रामवर शेअर करुन मिळालेल्या शिक्षेचा अनुभव सांगितला आहे. “आणखी एक दिवस…आणखी एक मेकओव्हर…होय, दररोज मला ही गोड शिक्षा मिळतेय. मेकअप आर्टिस्ट म्हणून या मुलीचं काहीही भविष्य नाही.” अशा आशयाची कॉमेंट तिनं या फोटोवर केली आहे.
ट्विंकलचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर विविध प्रकारचे रंग लावलेले दिसत आहेत. काहींनी हे पाहून निताराचे कौतुक केलंय तर काहींनी ट्विंकलला पुढच्या मेकअपसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री ट्विंकल खन्नाने सोशल मीडियाद्वारे कोरोनाबाबत जनजागृती करत मदतीचा हात पुढे केला असून, याद्वारे ती अनेक लोकांची मदत करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘क्वारंटाइन कालावधीमध्ये टॉवेलनं बॉलिंगचा सराव करत आहे’
- देशावर ब्लॅक फंगसचे संकट ; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- लॉकडाऊन नंतर पर्यटकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी MTDC आणि कर्मचाऱ्यांनी कंबर कसली
- विनाकारण फिरणाऱ्या ५०७ जणांची तपासणी, सलग तिसऱ्या दिवशी शून्य पॉझिटिव्ह!
- शिवराज नारियलवाले मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह ५ कर्मचारी निलंबित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
