Share

Samana : उद्धव ठाकरे यांनी एक मुलाखत काय दिली, अन् राज्यात जणू भूकंपाचे हादरेच बसले

Published On: 

Samana । मुंबई : काल आणि परवा दोन दिवस शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचे दोन्ही भाग प्रदर्शित झाले. शिवसेना खासदार आणि सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी हि मुलाखत घेतली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधलाय. यानंतर संजय राऊत हे वेळोवेळी सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांवर निशाणा साधत असतात. त्यानंतर आज देखील राऊतांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

फडणवीस व त्यांच्या सरकारला नैतिकतेचे कितीही प्रवचन झोडू द्या, खरे काय ते लोकांना माहीत आहे. ‘ठाकरे-राऊत’ मुलाखतीचा भूकंप म्हणजे मॅच फिक्सिंग असा आरोप करणारे फडणवीस हे काही ‘श्रीमान सत्यवादी’ नाहीत. आम्ही फडणवीसांच्या वक्तव्याची दखल घेतली. कारण ज्यांच्यावर किमान बोलावे व लिहावे असे ते व्यक्तिमत्त्व आहे. बाकी सगळे पादरे पावटेच आहेत. फडणवीस म्हणतात, ठाकऱ्यांची मुलाखत वाचनीय नाही. याचा सरळ अर्थ असा की, अस्सल मराठमोळा ठेचा असलेल्या या मुलाखतीने त्यांना ठसका लागला, जळजळ झाली. त्याला कोणी काय करायचे? असा सवाल सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकीय वादळानंतर एक मुलाखत काय दिली, राज्यात जणू भूकंपाचे हादरेच बसले. ठाकरे यांच्या मुलाखतीवर क्रिया-प्रतिक्रिया सुरू झाल्या. समस्त शिवसेना विरोधक एकजुटीची वज्रमूठ आवळून बेताल वक्तव्ये करताना दिसत आहेत. एका मुलाखतीत इतकी ताकद असते हे यानिमित्ताने महाराष्ट्राला कळले, असंही सामानातून म्हंटल आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!