औरंगाबाद : भराडी ग्रामपंचायती अंतर्गत तळणी या गावाजवळ अर्धा किमी अंतरावर सोमवारी काही शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्याने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावापासून अर्धा किमी अंतरावर २० एकर हुन अधिक पडीक जमीनीवर विविध झाडे, उंच झुडुपे आहे. या निर्जन ठिकाणी छोटा तलाव आहे व पाणी पिण्याच्या उद्देशाने बिबट्या येथे आला असावा अशी शंका गावकऱ्यांनी व्यक्त केली.
सोमवारी दुपारी शेतात काम करणाऱ्या काही शेतकऱ्यांना बिबट्या दिसला. बिबट्यास बघीतल्याने शेतातील बैल सुद्धा भीतीने बिथरले. या परिसरात बिबटया दिसण्याची ही पहिलीच घटना आहे. येथून १० किलोमीटर अंतरावर अजिंठा डोंगर आहे. सदर घटनेची माहिती जिल्हा परिषद सदस्य अशोक गरुड यांनी वनविभागास कळवली आहे.
गावकऱ्यांनी भिती बाळगू नये
उन्हाळ्याची सुरु झाल्याने जंगलात पाण्याची वानवा जाणवू लागली आहे. त्यामुळे अन्न व पाण्याचा शोधात बिबटे, हरीण, लांडगे व इतर वन्यजीवांनी आपला मोर्चा मानवी वस्ती तथा गावाकडे वळवला आहे. कोणताही वन्यप्राणी अधिक काळ गावाजवळ राहणे शक्य नाही त्यामुळे गावकऱ्यांनी बिबट्याची भीती बाळगू नये, येथील डॉ. संतोष पाटील यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत !
- शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण आता कशाला?
- पत्नीच्या संशयानुसार सचिन वाझेनेच मनसुख हिरेनला मारले, देवेंद्र फडणवीस सभागृहात आक्रमक
- महाविकास आघाडीचा विदर्भ, मराठवाड्यावर शैक्षणिक अन्याय; परीक्षा मंडळावर एकट्या पुण्यातुन 10 सदस्य
- ‘अमृता ताई गाण्याची आवड जोपासण्याचा प्रयत्न करता… अशीच आवड जोपासा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
