🕒 1 min read
मुंबई: इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, जेव्हा संपूर्ण देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५वी जयंती साजरी करत आहे, तेव्हा मला कळवताना आनंद होत आहे की, इंडिया गेटवर त्यांचा ग्रेनाइटचा भव्य पुतळा बसवला जाणार आहे. हे त्यांच्याप्रती भारताचे ऋणानुबंधाचे प्रतीक असेल. मोदींच्या या निर्णयाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve) यांनीही स्वागत केले आहे.
मोदींनी घेतलेला हा निर्णय देशाच्या प्रती नेताजींची निष्ठा, भक्ति आणि समर्पण याला दिलेली खरी श्रद्धांजली आहे. असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. दरम्यान नेताजींच्या जयंतीदिनी २३ जानेवारीला होलोग्राम पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते केले जाणार आहे.
जब तक नेताजी बोस की भव्य मूर्ति पूरी नहीं हो जाती, तब तक उनकी एक होलोग्राम प्रतिमा उसी स्थान पर मौजूद रहेगी।
प्रधानमंत्री श्री @narendramodi जी नेताजी की जयंती 23 जनवरी को होलोग्राम प्रतिमा का अनावरण करेंगे।#NetajiSubhasChandraBose pic.twitter.com/wD4HGFpcot— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) January 21, 2022
दरम्यान अमर जवान ज्योतीबाबत इंडिया गेटवर वाद सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. वास्तविक, सरकारने अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- लेबर कॉलनीवासियांना घरे रिकामी करावीच लागणार न्यायालयानेही फेटाळली याचिका..!
- गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जाहीर केली उमेदवारांची यादी
- “अमोल कोल्हेंचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही”, कॉंग्रेसचा इशारा
- कपिल शर्माने पृथ्वी शॉला विचारले, “तुला गर्लफ्रेंड आहे का?”; जाणून घ्या काय होते उत्तर
- भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले? शरद पवारांची खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
