नवी दिल्ली : जर तुम्ही देखील सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी दिलासादायक आहे. सध्या लगीनसराई आणि सणासुदीचा काळ सुरु आहे. त्यामुळे या काळात सोन्याचे दागिने खरेदी केले जाते. काळ बदलतोय आणि त्यानुसार सोनं खरेदी करण्याची पद्धतही बदलतेय. त्यामुळे प्रत्यक्ष सोने खरेदीऐवजी डिजिटल सोने खरेदी करुन तुम्ही सहज गुंतवणूक करु शकता.
केंद्र सरकारने ही संधी उपलब्ध करुन दिलीय. आजपासून रिझर्व्ह बँकेच्या सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेच्या सातव्या टप्प्याला सुरुवात होतेय. ही योजना आजपासून 29 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे पाच दिवसांसाठीच असणार आहे. या काळात गुंतवणूकदारांना बाजारपेठेपेक्षा कमी दराने सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हे बाँड खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर केल्यास तुम्हाला आणखी सूटदेखील मिळणार आहे.
सोने खरेदीसाठी ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळेल. या योजनेत एका आर्थिक वर्षात एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 4 किलो तर कमीत कमी 1 ग्रॅम गोल्ड बाँडची खरेदी करू शकते. शिवाय ट्रस्ट किंवा यासारख्या संस्था जास्तीत जास्त 20 किलो बाँडची खरेदी करू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मलिकांकडून फक्त इंटरव्हलपर्यंतची कथा, त्याच्यानंतरची मी सांगणार’
- जगाला सध्या धार्मिक, आर्थिक व राजकीय दहशतवादापासून धोका-रामदेव बाबा
- ‘देख लो यारो, गधे घोडे दौडा रहे है…’; भातखळकरांचा मलिकांना टोला
- अपघातप्रकरणी एनएचएआय , रिलायन्स इन्फ्रावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – मनसे
- भाजपचा बुरखा फाडणार, आणखी १० व्हिडिओ देणार; संजय राऊतांचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

