🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सहभागी व्हावं, अशी मागणी आता करण्यात येत आहे. त्यासाठी दिल्लीतील 6 शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ अण्णांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धीत दाखल झालं आहे. हे शिष्टमंडळ अण्णा हजारे यांच्यासोबत चर्चा करुन त्यांना आंदोलनात सहभागी होण्याची विनंती करणार आहे.
8 डिसेंबर रोजी दिल्लीतील शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली होती. त्यावेळी अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी इथं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत एक दिवसीय लाक्षणिक उपोषणही केलं होतं. त्यावेळी केंद्र सरकारनं शेतकरी आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी अण्णांनी केली होती.
दरम्यान, नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ पंजाब, हरियाणा येथील शेतकरी गेल्या तीन आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर निदर्शने करीत आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, परंतु सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये एकमत झाले नाही. शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, आम्ही पंजाबच्या शेतकरी संघटनांसह देशातील अनेक शेतकरी संघटनांशी चर्चा करीत आहोत आणि लवकरच यावर तोडगा निघू शकेल.
महत्वाच्या बातम्या
- भाजपमधील काही आमदार राष्ट्रवादीत जाणार? मलिक-भुजबळ म्हणाले…
- पंतप्रधान मोदींनी कडेकोट बंदोबस्ताशिवाय गुरुद्वारामध्ये दिली अचानक भेट
- अकाली दल-शिवसेनेच्या जाण्याने एनडीएमध्ये रिकामी झालेली जागा भरून काढणार ‘हा’ पक्ष ?
- नागपूर : २१ डिसेंबर पासून पाणी बिलावरीलही शास्ती होणार माफ
- नागपूर मनपाच्या माध्यमातून आठ हजार पथविक्रेत्यांना खेळते भांडवल कर्ज मंजुर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
