Share

‘आमदारकीचे टेन्शन संपले’…असे म्हणत भाजपने केले CM ठाकरेंचे अभिनंदन

Published On: 

मुंबई : राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात आता विधान परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. याच निवडणुकीच्या रिंगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उतरले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाची असलेली विधान परिषदेची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपला उमेदवारी अर्ज विधान भवनात दाखल केला.

यावेळी उद्धव ठाकरेंसह सहकुटुंब उपस्थित होते. पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा तेजस ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीचे नेतेही उपस्थित होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रस नेते अशोक चव्हाण, आदि नेते उपस्थित होते. तर आघाडीच्या इतर उमेदवारांनीही मुख्यमंत्र्यांंसोबत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

येत्या 21 तारखेला विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.मंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदी राहण्यासाठी लवकरात लवकर आमदार म्हणून निवडून येणं गरजेचं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्यक्ष मतदानाची वेळ येऊ नये, आणि निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा होती.

त्याप्रमाणे आता विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यामुळे भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आमदार झाले म्हणून अभिनंदन करण्यात आले आहे. आमदारकीचे टेन्शन संपले, मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन, असं ट्वीट करत महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस आणि मुंबईतील कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केल आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती आणि मुख्यमंत्र्यांचा आदर करत काँग्रेसने आपला एक उमेदवार मागे घेऊन एकाच जागेवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीचे पाच, तर भाजपचे चार उमेदवार बिनविरोध विधानपरिषदेवर निवडून जाणार असल्याचं रविवारी स्पष्ट झालं.

महत्त्वाच्या बातम्या 

चमत्कारिक ! 23 दिवसांच्या बाळाने केवळ आईचे दुध पिऊन कोरोनावर केली मात

‘स्थलांतरित कामगारांचा प्रवास ‘एसटी’ने विनामूल्य करण्यासाठी राज्य सरकारने आदेश द्यावेत’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!