पुणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज(१५ नोव्हें.)पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगशेकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते १०० वर्षांचे होते. बाबासाहेबांच्या निधानानंतर सर्वच राजकीय स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. आता यावरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन,व्याख्यान,‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला.मी त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो.भावपूर्ण श्रद्धांजली! असे ट्वीट अजित पवार यांनी केले आहे.
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी आहे. pic.twitter.com/hRpE2vD08P
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 15, 2021
दरम्यान रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, आदरणीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजून ०७ मिनिटांनी दु:खद निधन झाले. त्यांचे पार्थिव सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. अंत्यसंस्कार सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत केले जातील.
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे- मुख्यमंत्री ठाकरे
- शिवशाहिर बाबासाहेब यांचा घनिष्ट परिचय होणे जीवनातली मोठी उपलब्धी- राज्यपाल कोश्यारी
- पुरंदरेंच्या निधनामुळे एक उत्तुंग व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड-एकनाथ खडसे
- पुरंदरेंच्या जाण्यानी मनाला अतिशय वेदना होत आहेत-देवेंद्र फडणवीस
- पुरंदरेंच्या निधनाने इतिहास आणि संस्कृती विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली- पंतप्रधान मोदी


