🕒 1 min read
अकोला : ‘भारत बंद’च्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत कायद्याचा भंग केल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह १५० जणांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २७ सप्टेंबर रोजी अकोला शहरातील स्वराज भवन येथून रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. या रॅलीत अकोला शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बबनराव चौधरी, महापालिकेतील विरोधी पक्षनेते साजीद पठाण, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, पटोले यांनी रॅलीमध्ये ऑटो चालवला व त्यामध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोक बसले होते. तसेच त्या ऑटोला चहूबाजुंनी कार्यकर्ते लटकले होते.
https://twitter.com/NANA_PATOLE/status/1442382987253862405
कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता रॅली काढल्याने पोलिसांनी पटोले यांच्यासह साजीद खान मन्नान खान पठाण, राजेश भारती, बबनराव चौधरी, इलीयास ऊर्फ गुड्डू अलीयार खान पठाण, अविनाश देशमुख, अंशुमन देशमुख, सागर कावरे, मोहम्मद ब्रदुजमा, मोन्टु खान, महेश सुधाकर गणगणे, आकाश कवळे, शे.नवेद शे.इब्राहिम, निखीलेश दिवेकर, सुभाष कोरपे, पराग मधुकर कांबळे, अक्षय राजू इमानदार, डॉ. जिशान अजहर हुसैन यांच्यासह १०० ते १५० जण आणि ऑटोमध्ये बसलेल्या लोकांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी ३७ (१) (३) मुंबई पोलीस अधिनियम १९५१ प्रमाणे आदेश पारीत केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर करूनच मराठवाड्यात यावे’, आ.राणा पाटलांचा हल्लाबोल
- ‘इथेच पाप केलं तर इथेच पापं भोगावी लागतील’, मनसेचा राष्ट्रवादीला टोला
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर मराठवाडा व विदर्भाचा दौरा करणार
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

