🕒 1 min read
IND vs BAN | चट्टोग्राम : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यामध्ये सध्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेमधील दोन सामने पार पडले आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये बांगलादेश संघाने भारतीय संघाला पराभूत करून जेतेपद आपल्या नावावर केले आहे. बांगलादेशने या मालिकेमध्ये 2-0 आघाडी घेतली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेचा आज तिसरा म्हणजेच अंतिम सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकून आपली प्रतिष्ठा जपावी लागणार आहे. हा सामना सकाळी 11.30 वाजता सुरू होणारा आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम एक दिवसीय सामन्याची नाणेफेक सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यानंतर 11.30 वाजता हा अंतिम सामना जहुर अहमद चौधरी स्टेडियम चट्टोग्राम येथे सुरू होणार आहे. या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ला दुखापत झाली होती. त्यामुळे रोहित शर्मा या मालिकेतून बाहेर पडला अजून तो मायदेशी परतला आहे. दुसऱ्या सामन्यादरम्यान झेल घेताना रोहितच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये के. एल. राहुल (K.L. Rahul) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
तर, पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर वेगवान गोलंदाज कुलदीप सिंहने पाठीत जड आल्याची तक्रार केली होती. वैद्यकीय तपासणीनंतर कुलदीपला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापासूनच विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. दरम्यान, कुलदीप सेन देखील या मालिकेतून बाहेर पडला आहे. तर, वेगवान गोलंदाज दीपक चहरला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डाव्या हाताला दुखापत झाली होती. दुखापतीनंतर दीपक देखील या मालिकेतून बाहेर पडला होता. भारतीय संघातील दोन गोलंदाजांना दुखापतीमुळे बाहेर पडावे लागल्यामुळे बीसीसीआयने कुलदीप यादवचा संघात समावेश केला आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये होणारा तिसरा एकदिवसीय सामना जिंकून भारताला आपली प्रतिष्ठा जपावी लागणार आहे. बांगलादेश आजचा सामना जिंकला तर भारतीय संघाच्या नावावर नकोसा लाजिरवाना विक्रम होईल. भारतीय संघाला आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी आजचा सामना करो की मरो या धारेवर खेळावा लागणार आहे. आजचा सामना भारतीय संघाच्या कर्णधार के. एल. राहुलसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यांमध्ये भारतीय संघाला हा सामना जिंकून आपली प्रतिष्ठा जपावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Most Sixes in 2022 | आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियातील ‘या’ खेळाडूने लगावले आहेत सर्वाधिक षटकार
- Maharashtra Weather Update | विदर्भ थंडीने गारठला, तर मंदोस चक्रीवादळामुळे राज्यात ‘या’ ठिकाणी ढगाळ वातावरण
- Nana Patole | “चंद्रकांत पाटलांना ‘भीक’ आणि ‘लोकवर्गणी’ यातील फरक कळतो का?”; नाना पटोलेंचा खोचक सवाल
- Chandrakant Patil | महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “शेंडा नाही…”
- Amol Mitkari | चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याचा अमोल मिटकरींकडून समाचार; म्हणाले,
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
