Share

विदर्भात कॉंग्रेसला मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता शिवसेनेत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये नेत्यांच्या आयात निर्यातीचे सत्र सुरु झाले आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त आले आहे. त्यामुळे विदर्भात कॉंग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता आहे.

सतीश चतुर्वेदी हे विदर्भाच्या राजकारणातील मोठे प्रस्थ आहेत. 25 वर्ष आमदार आणि 10 वर्ष कॅबिनेट मंत्री असल्याने सतीष चतुर्वेदी यांचा विदर्भात मोठा जनसंपर्क आहे. दुष्यंत चतुर्वेदी सध्या त्यांच्या शैक्षणिक संस्थांचं काम पाहण्यासोबतच सामाजिक कामांमध्येही व्यस्त असतात. आता राजकीय कारकीर्दीची सुरुवात करणार आहेत. ही सुरवात ते शिवसेनेतून करणार आहेत.

दरम्यान दुष्यंत चतुर्वेदी हे शिवसेनेसाठी गेम चेंजर ठरणार असल्याचं सांगितल जात आहे. कारण सतीश चतुर्वेदी यांच्या कारकिर्दी पासून चतुर्वेदी घराण्याचा जनतेशी चांगला संपर्क आहे. त्यामुळे माजी मंत्र्याच्या मुलाला पक्षात घेऊन शिवसेनेकडून विदर्भात आणखी जम बसवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तर शिवसेना विदर्भात भाजपलाच शह निर्माण करणार असल्याचं दिसत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!