औरंंगाबाद : घरातून सलूनमध्ये जाण्यासाठी निघालेल्या बारा वर्षीय बालकाला रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाजवळ घडली. रोहित रामदास तुपे (वय १४, रा.मुकुंदनगर, मुकुंदवाडी) असे मृत बालकाचे नाव आहे.
रोहितचे कुटुंबिय मुकुंदनगरमधील शनिमंदीराजवळ राहतात. त्याचे आई-वडील खासगी कंपनीत कामाला आहेत. दुपारी तो सलूनमध्ये कटींग करण्यासाठी जात होता. तेव्हा अचानक रेल्वे रूळावरुन जाताना अंदाज न आल्याने रेल्वेचा धक्का लागून रोहित गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणाचा पुढील तपास जमादार प्रभाकर भिडे करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- केंद्रातील फक्त मंत्री नव्हे तर पंतप्रधानच बदलण्याची गरज – नाना पटोले
- ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा राणेंनी काय प्रतिक्रिया दिली होती ते आठवावं’
- राणेंची मंत्रिपदी वर्णी लागल्याने शिवसेना-भाजपच्या युतीची शक्यता अधिक धूसर ? फडणवीस म्हणाले…
- काश्मीरमध्ये चोवीस तासात पाच दहशतवाद्यांचा खात्मा, हिजबुलचा टॉप कमांडर ठार
- विरोधकांवर भारी ठरला दानवेंचा ‘चकवा’, रेल्वे राज्यमंत्री पदी मिळवली बढती!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

