Share

‘दिल्लीचा तख्त महाराष्ट्राला पवार साहेबांमुळे झुकवू शकला नाही’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेचा निकाल लागून एक महिना उलटला तरी सत्तास्थापनेचा कोणीही दावा केलेला नाही. परंतू दिल्लीत मागील दोन दिवसांत घडलेल्या घडामोडींमुळे लवकरच शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मनाला जात आहे.

अनेक राज्यांत भाजपचे चाणक्य अशी ओळख असणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आवाक्यात नसताना देखील भाजपची सत्ता स्थापन केली. मात्र महाराष्ट्रात अमित शहा यांचे मनसुबे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उधळून लावले. “राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या शरद पवारांनी विधानसभा निवडणूक एकट्याच्या ताकदीवर लढवून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला चांगले दिवस आणले आहेत. तर निकाल लागल्यानंतर आपल्या राजकीय कुशलतेने शिवसेनेसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्तेत बसवले आहे. त्यामुळे दिल्लीचा तख्त पवार साहेबांमुळे महाराष्ट्राला झुकवू शकला नाही”. अस वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले आहे.

अखेर भारतीय राजकारणाचे तथाकथित चाणक्याला पवार साहेबांनी हरवले आहे. दिल्लीचा तख्त पवार साहेबांमुळे महाराष्ट्राला झुकवू शकला नाही. अस ट्विट नवाब मलिक यांनी केले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकी अमित शहा आणि शरद पवार यांच्या चांगलच वाकयुद्ध रंगलं होत. यात देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अमित शहांना चांगलच फैलावर घेतल होत. आता निकालानंतर देखील या युद्धाचा दुसरा अंक पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1197761408403832833?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1197764915026526208?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!