Share

शेतकऱ्यांना मदतीमुळे मिळेल दिलासा- पंकजा मुंडे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मदत जाहीर केली आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा भेटणार असल्याचे मत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. दोन हेक्टरपर्यंतच्या खरीप पिकांसाठी आठ हजार रुपये, तर फळबागांसाठी १८ हजार रुपयांची प्रतिहेक्टरी मदत शनिवारी घोषित करण्यात आली.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले खरिपाचे पीक गेले. शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी राज्यपालांकडे मागणी केली होती, असेही मुंडे यांनी पत्रकात म्हटले आहे.
दोन हेक्टरपर्यंतच्या पिकांच्या नुकसानीसाठी आठ हजारांची प्रतिहेक्टरी मदत, तर बागायत शेतीसाठी १८ हजारांची मदत तत्काळ शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत.

याशिवाय नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा शेतसारा, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचे आदेशदेखील दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा भेटणार असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1196042590673461248?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1196034482257592321?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!