Share

सारखं-सारखं काय विचारता? निश्चितच शिवसेनेचाच मुख्यमंत्री : नवाब मलिक

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील सत्तास्थापनेचा घोळ ज्या मुख्यमंत्रिपदावरुन झाला. तसेच दुसरीकडे शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांच्या बैठकांचे सत्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाव मलिक यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असा पुनरुच्चार आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, सारखा-सारखा हा प्रश्न का विचारला जातो, की मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार का? निश्चितच शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार असे नबाव मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद झाला होता. त्यामुळे निश्चितच शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार. शिवसेनेला अपमानित करण्यात आलं होतं. त्यांचा स्वाभिमान कायम राखणं ही आमची जबाबदारी आहे,’ असे नवाब मलिक यावेळी म्हणाले.

दरम्यान, राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या बैठकी आणि चर्चांचे सत्र सुरु आहे. महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती निवडणुका होणार का याबद्दल दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरु झाली आहे. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘राज्यामध्ये मध्यवर्ती निवडणुका होणार नाही तुम्ही तुमच्या कामाला लागा,’ असा आदेश राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1195222618028167168?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1195221928950157314?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!