🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी शरद पवारांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्राला स्थिर सरकार द्यायला हवे, असे ते म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.
तसेच ‘देशाचे नेते असणाऱ्या त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा,’ असे आ.रवी राणा म्हणाले.
राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीबाबत रवी राणा यांनी भाष्य केलं. म्हणाले, ‘राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागणे अत्यंत दुर्देवी आहे. महाराष्ट्राच्या जनतेने भाजपा शिवसेनेच्या महायुतीच्या बाजूने कौल दिला, असे ते म्हणाले.
दरम्यान, ‘देवेंद्र फडणवीस यांनी १० ते १५ वेळा मातोश्रीवर फोन करुन, शिवसेनेची संपर्क साधून एकत्र येत सरकार बनवायला हवं होत,अशी इच्छा त्यांनी यावेळी बोलून दाखवली. राज्यात विधानसभा निवडणुकीत मतदार राज्याने महायुतीला बहुमताचा कौल दिला मात्र भाजप-शिवसेना सत्ता स्थापनेत महायुतीला अपयश आले. तसेच शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी या पक्षात बैठीकांचे सत्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1195204164105588736?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1195197897152663552?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
