🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा :- भाजप बऱ्याच काळापासून गोड बातमी देणार गोड बातमी देणार असं म्हणत आहे. मात्र, ती कधी येणार याची वाट पाहतो आहे. गोड बातमी देणार म्हणत भाजपनं मॅटर्निटी हॉस्पिटल सुरू केलं आहे का, असा प्रश्न करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपला टोला लगावला आहे.
पुढे बोलताना थोरात म्हणाले, सत्ता स्थापनेचा जो पोरखेळ सुरू आहे त्याला भाजपच जबाबदार आहे. भाजप साम-दाम-दंड-भेद अशी नीती वापरत काँग्रेसमध्ये फोडाफोडीचा प्रयत्न करात आहेत. मुनगंटीवार हे दररोज गोड बातमी मिळेल असं सांगतात. मात्र गोड बातमी मिळत नाहीये. कसली गोड बातमी, भाजपने तर महाराष्ट्राचं मॅटर्निटी हॉस्पिटल केलं अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.
दरम्यान लवकरच गोड बातमी मिळेल असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी सांगितलं. भाजपचे नेते राज भवनावर जाणार असल्यानं गुरुवारी गोड बातमी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण सरकार स्थापनेचा दावा न करताच, केवळ राज्यपालांशी कायदेशीर बाबींवर चर्चा करून भाजपचे नेते परतले. त्यामुळं गोड बातमी मिळाली नाहीच.या पार्श्वभूमीवरच थोरात यांनी यांनी भाजपला टोला लगावला.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1192389390422511616?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1192423000898826240?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1192427293496315904?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
