🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : संताजी घोरपडे हे नाव लातूर जिल्ह्यातील केळगाव (ता.निलंगा) पंचक्रोशीत सध्या कमालीचे चर्चेत आहे.त्याला कारण ही तसेच आहे. कंञाटदार असलेले घोरपडे यांनी केळगाव येथे विविध विकास कामे करुन सेवाभाव साधला आहे. शिंदे डेव्हलपर्स या कंपनीच्या माध्यमातून केळगावच्या ग्रामस्थांना आर्थिक मदतीचा हात देवू केला आहे.
पुणे येथील शिंदे डेव्हलपर्स प्रा.लि.या कंपनीकडून लातूर -जहिराबाद या हायवेचे काम मागील २ वर्षापासून चालू आहे.या कंपनीचे केळगाव येथे कार्यालय व खडी केंद्र आहे.केळगाव येथील कंपनीच्या कार्यालयातून कंपनीचे संचालक संताजी घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या रस्त्याचे काम केले जात आहे. हिंदू व मुस्लिमांचे श्रध्दास्थान असलेले केळगाव येथील हंबीरबाबा देवस्थान सामाजिक ऐक्याचे एक सुंदर प्रतिक आहे.परंतु सदरील ग्रामदैवत हे टेकडीवर असल्याने भाविकांना टेकडी चढताना मोठा ञास सहन करावा लागायचा.
दरम्यान केळगाव येथील ग्रामस्थांच्या एका शिष्टमंडळाने या देवस्थानला सिमेंट काँक्रीटच्या पाय-या बांधून देण्याची मागणी घोरपडे यांच्याकडे केली. ग्रामस्थांकडून हि मागणी होताच संताजी घोरपडे यांनी या देवस्थानला पाय-या बांधून दिल्या. उन्हाळ्यात गावातील इंदीरा नगर या भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी त्या भागातील लोकांनी बोअर पाडून देण्याची मागणी घोरपडे यांच्याकडे करताच घोरपडे यांनी तत्काळ ग्रामपंचायतीला बोअर पाडून देवून विद्युत पंप दिले.
केळगावपाटी ते केळगाव या रस्त्याचे डांबरीकरण पुरते उखडून गेल्याने रस्त्याची दुरावस्था झाली होती.परिणामी या रस्त्यावरुन पायपीट करत असताना ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत होती.सदरील रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी पुढे येताच घोरपडे यांनी कंपनीच्या यंञणेच्या माध्यमातून या रस्याच्या मजबुतीकरणाचे काम केले.पावसाळ्यात आनंदमुनी विद्यालयाच्या प्रांगणात मोठा चिखल होत असल्यामुळे खडी टाकण्याची मागणी शाळेच्यावतीने करताच शाळेच्या प्रांगणात खडी टाकण्यात आली.
उन्हाळ्यात ग्रामस्थांनी पाण्याची मागणी केल्यास टँकरने पाणी पुरवठा केला.या रस्त्यावरील पुलाचे काम चालू असताना रस्त्याशेजारील एका शेतक-याच्या विहीरीचे नुकसान झाल्यामुळे त्या शेतकऱ्याची कंपनीकडून विहीर बांधून देण्यात आली. एवढेच नव्हे तर या भागातील शेतकरी व ग्रामस्थांनी कोणतीही सार्वजनिक मदत मागितल्यास संताजी घोरपडे हे सामाजिकबांधीलकी जोपासत शेतकरी व ग्रामस्थांच्या सार्वजनिक मदतीसाठी धावून येतात. वेळोवेळी देवू केलेल्या या भरीव मदतीमुळे संताजी घोरपडे हे केळगाव ग्रामस्थांमध्ये एक दानशूर व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात.केळगाव येथे ही कंपनी आल्यामुळे येथील युवकांच्या व मजुरांच्या हातालाही मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1192366804011610113?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1192366593650487296?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
