🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : ”देशी गायींच्या दुधात अस्सल सोनं असतं, परदेशी गायी मात्र गोमाता नसून आपल्या मावशा (आंटी) असतात,” असा अजब गजब शोध पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी लावला आहे. कोलकत्यात आयोजित एका भाषणात त्यांनी असे विधान केले आहे. तसेच जे बुद्धीजीवी रस्त्यावर गोमांस खात आहेत. त्यांनी कुत्र्याचेही मांस खावे, अस म्हणत त्यांनी गोमांस खाणाऱ्यावरही निशाणा साधला आहे.
घोष म्हणाले, ”देशी गायींचं स्वतःचं असं वैशिष्ट्य असतं. त्यांच्या दुधात सोनं मिसळलेलं असतं. याच कारणामुळे त्यांचं दूध सोनेरी रंगाचं दिसतं. एक नाडी असते, जी सूर्यकिरणांच्या मदतीने सोनं तयार करण्यात मदत करते. म्हणून आपण देशी गायींचं जतन करायला पाहिजे. जर आपण देशी गायींचं दूध प्यायलं, तर आपण धष्टपुष्ट होऊ. आपण ज्या परदेशी प्रजातींच्या गायी आणतो, त्या गायी नसतातच मुळी. त्या एक प्रकारचं जनावर असतात. परदेशी गायींचा आवाजही देशी गायींप्रमाणे नसतो. त्या आपल्या गोमाता नसतात, तर मावशा असतात. आपण या आंटींची पूजा केली, तर ते देशाच्या हिताचं नाही. असंही घोष यावेळी म्हणाले.
तसेच ‘ गाय आपली माऊली आहे. आपण गायीचं दूध पिऊन जिवंत राहतो. जर कोणी माझ्या आईसोबत गैरवर्तन केलं, तर मी तेच करणार जे योग्य आहे. भारतासारख्या पवित्र भूमीवर गायींची हत्या आणि गोमांस खाणं हा गुन्हाच आहे.’ असंही घोष यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1191651098383093760?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1191654223827464192?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
