Share

शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी चंद्रकांत पाटील थेट बांधावर

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारी पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. हाती आलेले निघून गेल्याने शेतकरी वर्ग निराशेच्या छायेत आला आहे.

महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील अतिवृष्टीनेग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, ‘अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना दिलासा देणे शासनाची जबाबदारी असून त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही,’ असे म्हणत पाटील यांनी शेतकर्यांना धीर दिला.

दरम्यान, ‘अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतजमिनी, फळबागांचे पंचनामे 6 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना,’ चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. रविवारी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या नाशिक मधील इगतपुरी, निफाड, ओझर, दिंडोरी या तालुक्यांतील नुकसानग्रस्त शेतपिकांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन रामदास आठवले यांनी पाहणी केली.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1191250004175814657?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191246675500650497?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191246200768352256?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!