Share

राज ठाकरे ९ नोव्हेंबरला आगामी रणनीती ठरवणार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – राज्यात सध्या सत्ता स्थापनेविषयी वेगवेगळ्या राजकीय पक्षांची चर्चा सुरु आहे. भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री कुणाचा होणार याबाबत मतभेद आहेत. असं असतानाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपली भूमिका ही ९ नोव्हेंबरला जाहीर करणार आहे.

नुकत्याचं पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला अवघ्या एका जागेवर विजय मिळाला आहे. त्यामुळे आगामी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे हे तयारीला लागले आहेत. यासाठी राज ठाकरे येत्या ९ नोव्हेंबर रोजी ठाण्यात येणार असून ते दिवसभर पदाधिकाऱ्यांशी विधानसभा निहाय बैठका घेऊन चर्चा करणार आहेत.

राज ठाकरे यांनी ‘ठाण्यातील तीन आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघांत मनसेने आपले उमेदवार उभे केले होते. यामध्ये कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील हे राज्यातील मनसेचे एकमेव उमेदवार निवडून आले आहेत. तर, ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा थोडक्यात पराभव झाला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जरी एक जागा मिळाली असली तरी ठाण्यात त्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत चांगली कामगिरी करून भविष्यासाठी पायाभरणी करण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न असणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1190889872946532359?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1190889213404831744?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1190885865532223488?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!