🕒 1 min read
मुंबई : कर्जमाफीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली नसताना अद्याप अर्जाची छाननी झाली नसताना सरकारने 10 लाख बोगस शेतक-यांचा शोध कसा लावला असा सवाल विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्याचबरोबर सरकार शेतक-यांना घाबरवीत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांचे असो की मंत्र्यांची वक्तव्य सारखीच असून ते शेतक-यांचा अवमान करीत आहेत अस देखील धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
दरम्यान , कर्जमाफीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये 80 लाख पात्र, तर दहा लाख बनावट शेतकरी असल्याचा दावा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात केला होता . कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करताना अजूनही काही शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. मात्र ज्यांची बँक अकाऊंट बोगस आहेत, अशा शेतकऱ्यांनाच या अडचणी येत असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं होत.
आता सहकार मंत्र्यांच्या या वादग्रस्त विधानाचा धनंजय मुंडे यांनी समाचार घेतल्याने शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
शेतक-यांना बोगस म्हणणारे सरकार शेतक-यांबाबत असंवेदनशील.मंत्र्यांचे हे वक्तव्य म्हणजे कर्जमाफी बद्दलची त्यांची नकारात्मक मानसिकता दाखवते. 1/3 https://t.co/LdyEHRhfj1
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 12, 2017
कर्जमाफीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली नसतांना अद्याप अर्जाची छाननी झाली नसतांना सरकारने 10 लाख बोगस शेतक-यांचा शोध कसा लावला. 2/3
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 12, 2017
सरकार शेतक-यांना घाबरवीत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांचे असो की मंत्र्यांची वक्तव्य सारखीच असून ते शेतक-यांचा अवमान करीत आहेत. 3/3.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 12, 2017
कर्जमाफी मागणारे १० लाख शेतकरी बोगस – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
