Share

लातुरात दोन्ही देखमुख बंधू आघाडीवर

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. मतदानावेळी काही ठिकाणी पावसाचे सावट असल्याने मतदानाचा टक्का काहीसा घसरताना दिसला. तर शहरी भागा पेक्षा ग्रामीण भागात मतदान मोठ्या प्रमाणात झाले आहे. काही एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलनुसार भाजप आणि शिवेसेनेला बहुमत मिळत असल्याच सांगण्यात येत आहे. मात्र मराठवाड्यातील लातूर ग्रामीण आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण या मतदारसंघात देशमुख बंधूची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख हे लातूर शहर तर धीरज देशमुख यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आता सुरवातीच्या कलांमध्ये दोन्ही देखमुख बंधू यांनी आघाडी घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीचा गड राखणार का? काँग्रेस-राष्ट्रवादी आपल्या जागा वाढविणार की घसरणार? मनसेचं खातं उघडणार का? वंचितचं काय होणार? यासगळ्यांची प्रतिक्षा आता थोड्यात वेळात संपणार आहे. या निकालांचे प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देणार असून निकालाची क्षणाक्षणाची बित्तमबातमी तुम्ही आमच्या वेबसाईटवर पाहू शकता.

https://twitter.com/Maha_Desha/status/1187215473122787329?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1187214599528972289?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!