🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून संकल्पपत्र जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये विविध मुद्द्यावर भाजपाकडून जनतेला आश्वासन देण्यात आली आहे. यामध्ये राज्याची अस्मिता आणि अभिमानास्पद वारसा जोपसण्यासाठी भाजपाने महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्याती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने गौरव व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच गेल्या ५ वर्षात अरबी समुद्रातील रखडलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक आणि इंदुमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक पूर्ण करणार असल्याची घोषणा करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देणे म्हणजे भगतसिंग यांच्या बलिदानाचा अपमान ठरेल,’ असं मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेता कन्हैया कुमार यानं व्यक्त केलं आहे.नगरमधील भाकपचे उमेदवार बहिरनाथ वाकळे यांच्या प्रचारासाठी आला असता तो बोलत होता.
दरम्यान, याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी काल भाजपवर निशाणा साधला आहे.भाजपचे संकल्पपत्र म्हणजे निव्वळ गाजरांचा पाऊस आहे. भाजपने संकल्पपत्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात मी ही मागणी गेल्या दोन-तीन वर्षांपासून लोकसभेत करत आहे. विशेष म्हणजे त्यावेळीही भाजपचे सरकार होते. मग निवडणुका आल्यावरचं भाजपवाल्यांना भारतरत्न का आठवला? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1184740054536577025?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1184739856037007362?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
