Share

अब्दुल सत्तार काय तुमच्या आईचा… ठाकरेंवर टीका करताना हर्षवर्धन जाधवांची जीभ घसरली

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – राज्यात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. सगळेच नेते प्रचारात व्यस्त आहेत. प्रचारावेळी अनेक नेत्यांची जीभ घसरताना पाहायला मिळत आहे. शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे संस्थापक हर्षवर्धन जाधव यांचीही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आहे.

एका प्रचारसभेत बोलताना जाधव यांनी ‘हा हरामखोर हर्षा, याच्यामुळे मुसलमान निवडून आला लोकसभेला. हे शिवसेनेचं भाषण आहे. दुसरं काही भाषण नाही त्यांच्याकडं. आमचा उमेदवार असं करतो, तसं करतो हे नाही. आमच्या खासदाराने पंचवीस वर्षात काय केलं हे नाही. आमच्या उमेदवाराला किती अक्कल आहे, तो ट्रफिक पोलिसला फोन करू शकतो की नाही, हे नाही.

पुढे बोलताना हर्षामुळे मुसलमान आला ना निवडून. आहो तुम्ही येडे झाले का, त्याला कुठं मतदान करू ऱ्हायले. हे शिवसेनेच भाषण राहणार आहे उद्या. केलंच तसं भाषण त्यांनी परवा, उद्धव ठाकरेंनी. हिरवा वरती चढवला, भगवा खाली आला. मी त्यांना एक प्रश्न विचारतो, विधानसभेतही विचारतो आणि तुमच्या समक्षही शिवसैनिकांना एक प्रश्न विचारतो.

एव्हढंच तुम्हाला मुसलमानांच्याबद्दल वावडं आहे, तर सत्तार तुमच्या आईचा नवरा लागतो का? कोण लागतो सत्तार हा? कोण लागतो सत्तार तुमचा? पाहुणा आहे, चुलता आहे? हमारे अब्दुल भाई अभी अभी शिवसेना में आये है… असं विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्या या भाषणाची क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1184330935040270337?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1184323690344828928?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1184319156599918592?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!