Share

जावई विरोधात असतानाही ७० हजारांचं लीड दिलं – शिवाजी कर्डिले

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. यावेळी अनेक नेते मतदारांना वेगवेगळी आश्वासने देताना दिसत आहेत. तसेच एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. अशातच राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

शिवाजी कर्डिले यांनी विरोधकांवर टीका करताना लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेकांनी माझ्यावर आरोप केले. मात्र अहमदनगरमधून जावई संग्राम जगताप विरोधी पक्षातील उमेदवार असतानाही माझ्या मतदारसंघातून सुजय विखेंना 70 हजारांचा लीड देण्याचं काम मी केलं होतं असं विधान केले आहे.

पुढे बोलताना त्यांनी ‘काही जणांची स्थिती ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी आहे. त्यामुळे माझ्यावर ते आरोप करतात. रात्री दोन वाजेपर्यंत जागून सकाळी 12 वाजता उठणारी हीच ती माणसं आहेत अशा खरपूस शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.

पुढे बोलताना त्यांनी ‘निवडणुकीच्या काळात प्रक्रियेचा भाग म्हणून मी प्रचार करतो. खरं तर निवडून आल्यानंतर लगेच माझा प्रचार सुरु होतो. सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत माझा जनतेशी संपर्क असतो. दर आठवड्याला जनता दरबार भरतो. त्यामुळे मला कुठलीही अडचण वाटत नाही असंही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182578895905624069?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182567264916140032?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182567001350213634?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!