Share

शिवसेनाप्रमुखांना कधी माणसं आयात करावी लागली नाही, पक्षांतरावरून राज यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सांताक्रूझ येते विधानसभा निवडणुकीची पहिली प्रचारसभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी राज्याला आता प्रबळ विरोधी पक्षाची गरज असल्याची मागणी केली. जो पर्यंत प्रबळ विरोधी पक्ष निर्माण होणार नाही तो पर्यंत जनतेचे प्रश्न सुटणार नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी जनतेला विरोधी पक्षाची धुरा माझ्या हातात द्या असे आवाहन केले.

पुढे बोलताना राज ठाकरे यांनी पक्षांतारावरून उद्धव ठाकरेंवर निशाण साधला. त्यांनी ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते ते सर्व शिवसेना भाजपमधून निवडणूक लढवतात, कुठे आहे पार्टी विथ डिफरन्स, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कुठूनही माणसं आयात करायला लागली नव्हती. त्यावेळी ती सर्व माणसं तिथे होतीच अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर निशाना साधला आहे.

पुढे बोलताना ‘शिवतीर्थावर शिवसेना प्रमुखांनी आरोळी ठोकली होती की, आम्ही राजीनामा देऊ, आता कोणाही पुढे जाणार नाही. आमची एवढी वर्ष सत्तेत सडली, आणि आमची 124 जागांवर अडली. या असल्या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. सरकारला वठणीवर आणायला सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे आणि त्यासाठी मी तुमच्या समोर आलो आहे असं विधान केले.

यावेळी राज ठाकरे यांनी पीएमसी बँक घोटाळ्यावरून भाजपला लक्ष्य केले. देशात बँक घोटाळे होत आहेत. लोकांना हक्काचे पैसे मिळत नाही. माणस रडतायत तरी सत्ताधाऱ्यांना फरक पडत नाही. कारण बँकेच्या अधिकार पदावर भाजपचीचं माणस आहेत. आज शेतकरी आणि कामगार ओरडतायतं, विद्यार्थी ओरडतायत, मात्र राजकीय पक्ष आणि सत्ताधारी केवळ जाहीरनामे देतायतं, असे ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182502165899698176?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182315280678047745?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!