Share

कलम ३७० झाले, सरकारने आता कलम ३७१ रद्द करावे – पवार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकार २.० ने सत्तेवर आल्यावर कलम ३७० रद्द केले आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ झाला होता. याविविषयी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे. त्यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर आता केंद्र सरकारने कलम ३७१ रद्द करण्यासाठी पावले उचलावीत आम्ही त्याला पाठिंबा देऊ असं विधान केले आहे.

शरद पवार सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. ते प्रचारानिमित्त नागपूर येथे आले असता त्यांनी ‘कलम ३७० रद्द करायला कोणाचाही विरोध नव्हता. फक्त त्यापूर्वी काश्मीरमधील लोकांना विश्वासात घेतले जावे, अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, विरोधकांवर देशद्रोही असल्याची टीका करण्यात आली. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधील परिस्थितीबाबत पंतप्रधानांना पत्र लिहणाऱ्या साहित्यिक आणि नामवंतांवरही गुन्हे दाखल करण्यात आले असं विधान केले आहे.

पुढे बोलताना पवार यांनी ‘कलम ३७० रद्द झाल्याने काश्मीरमध्ये घर, जमीन खरेदी करता येते. याचे आम्ही स्वागत करतो. पण ३७१ अनुच्छेदानुसार नागालँड, मेघालय, सिक्कीम, मणिपूर या ईशान्येकडील राज्यांमध्ये कुणालाच जमीन खरेदी करता येत नाही. हे हा कलम रद्द करत असाल तर त्यासाठी आम्ही सहकार्य करू. पण हे सरकार ३७१ संदर्भात काहीही करायला तयार नाही. कारण, सरकारला कलम ३७० वरून जनतेची दिशाभूल करायची आहे असंही पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, कलम ३७० रद्द करण्याचे विधेयक गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत मांडले होते. परंतु हे विधेयक मांडण्यापूर्वी सरकारने काश्मीरमध्ये संचारबंदी लागू केली होती. तसेच स्थानिक नेत्यांना ताब्यात घेतले होते.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182315280678047745?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182312063739166720?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182309137239007233?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!