🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : रिझर्व बँकेने पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) वर घातलेल्या निर्बंधांच्या विरोधात ठाण्यातील ठेवीदारही कमालीचे संतप्त झाले आहेत. रिझर्व बँकेने पीएमसी बँकेवर निर्बध घातले असल्याचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले असताना, पंजाब महाराष्ट्र बँकेच्या खातेधारकांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना घेराव घेतला.
मुंबईत आलेल्या निर्मला सीतारामन भाजपाच्या नरिमन पॉईंटमधील कार्यालयात जात असताना त्यांना पीएमसी बँकेच्या ग्राहकांच्या रोषाचा सामना करावा लागला. पीएमसी बँकेवर लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे अडचणीत आलेल्या ग्राहकांशी सीतारामन यांनी चर्चा केली.
पंजाब महाराष्ट्र बँकेच्या खातेधारकांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना घेराव घेतला. आर्थिक अनियमितता असल्यानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पीएमसी बँकेवर निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध उठवण्याच्या मागणीसाठी बँकेच्या खातेधारकांनी अर्थमंत्र्यांसमोरच आंदोलन केलं.
यानंतर सीतारमण यानी पत्रकारांना संबोधित केलं. आज संध्याकाळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्याशी बोलून ग्राहकांना होणाऱ्या त्रासाची माहिती त्यांना देईन, असं सीतारामन म्हणाल्या. ग्राहकांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी त्यांना विनंती करेन, असंदेखील त्यांनी पुढे सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182208678281134080?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182207087599738881?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
