Share

मॉब लिंचिंगसारखे प्रकार भारतात होतचं नाहीत- मोहन भागवत

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा;- नागपुरमधील रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पार पडला.  या मेळावाच्या  सुरुवातीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं. त्यानंतर स्वयंसेवकांनी पथसंचलन आणि इतर कवायतींचं प्रात्यक्षिकं दाखवली. यानंतर मोहन भागवत यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना भागवत म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव नेहमीच मॉब लिंचिंगच्या घटनांशी जोडले जाते, अशा घटनांशी संघाचा काहीही संबंध नाही, असे सांगतानाच लिंचिंग हा शब्दच भारतातला नसून, मॉब लिंचिंगसारखा प्रकार भारतात होतच नाही,असे वक्तव्य त्यांनी केले.

तसेच मॉब लिंचिंगवर बोलताना त्यांनी येशू ख्रिस्त आणि गौतम बुद्धांच्या काळातील उदाहरणे दिली. येशू ख्रिस्ताच्या काळात एका स्त्रीवर सर्वांनी हल्ला केला, लोक तिला दगड मारू लागले. मात्र ज्याने पाप केले नाही, त्यानेच पहिला दगड मारावा असे येशू ख्रिस्ताने सांगितले…. गावात पाण्यावरून झालेले भांडण गौतम बुद्धान सोडवले असे सांगत लिंचिंग हा शब्द आपल्याकडील नाही, तो बाहेरून आला असे सांगत भारतात लिंचिंग हा प्रकार घडतच नसल्याचे भागवत म्हणाले.

अल्पसंख्यकांमध्ये भय निर्माण करण्यात येत असून एकमेकांमध्ये भेद निर्माण करून दुरी निर्माण करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामागे काही विशिष्ट लोक आहेत. याचा प्रतिकार करण्यासाठी, नियंत्रण मिळविण्यासाठी कायदा आहे. पण त्याचा प्रामाणिकपणे आणि सक्तीने अंमल व्हायला हवा, असेही भागवत पुढे म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थिती होते. यासोबतच या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून एचसीएलचे अध्यक्ष शिव नाडर हे देखील उपस्थित राहिले होते.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181446252577226752?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181450463389995008?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!