Share

गांधी लढे थे गोरोंसे, हम लढेंगे चोरोंसे – अमित देशमुख

Published On: 

🕒 1 min read

लातूर : महात्मा गांधी यांच्या विचारांच्या विरुद्धध दिशेने काम करणारे हे सरकार आहे गांधी जी गोरसे लढते पर अब हम हम लढेंगे चोरो से अशी टीका विरोधकांवर अमित देशमुख यांनी केली.

शहरातील बूथप्रमुख, कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. देशमुख म्हणाले, सत्ताधाऱ्यांकडे एक हाती सत्ता असतानाही राज्यासह जिल्ह्याचा विकास केला नाही. फक्त विकास या शब्दाचा जागर करून गाजावाजा केला. त्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही. माझ्याबद्दल अफवा पसरवणे, खोटेनाटे बोलणे, वैयक्तिक टीका करणे यावरच विधानसभा निवडणुका जिंकण्याचा सत्ताधाऱ्यांचा कट आहे. मतदारांनी मतदानरुपी आशीर्वाद देऊन हा कट हाणून पाडावा, असे आवाहन आमदार अमित देशमुख यांनी येथे केले.

यावेळी नगरसेवक सचिन बंडापल्ले यांच्या पुढाकारातून विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि धीरज तिवारी यांच्या पुढाकारातून लातूर भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शैलेश तिवारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे देशमुख यांनी स्वागत केले.

सत्ताधाऱ्यांना एक छदाम निधी आणता आला नाही. रस्त्यावरील खड्डेसुद्धा बुजवता आले नाहीत. महानगरपालिकेचे कंत्राटदार कामे अर्धवट सोडून पळून जात आहेत. भाजप सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता नागरिकांची फसवणूक करून क्रूर चेष्टा करण्याचे काम शहरात केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

वर्षभराची पाणीपट्टी म्हणून अठराशे रुपये वसूल करणारी महानगरपालिका फक्त एक महिनाच वर्षात पाणी देते; पण 365 दिवसांची पाणीपट्टी वसूल करते. त्यामुळे लातूरकरांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते ही शोकांतिका आहे. पूर्वी कॉंग्रेस सत्ता असताना मनपाने दुष्काळ आहे म्हणून दोन वर्षांची पाणीपट्टी माफ केली होती. आता पण दुष्काळ आहे, पाणीपट्टी माफ का होत नाही असा सवालही यावेळी आमदार देशमुख यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1179701144437673985?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1179700411256561665?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1179696781975638016?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!