🕒 1 min read
तळेगाव दाभाडे : येथील तरुणांना मतदानाचे आणि लोकशाहीचे महत्व समजावून सांगण्यासाठी मावळचे आमदार आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मतदारसंघातील युवकांसाठी युवासंवाद हा कार्यक्रम आयोजित केला होता. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या युवसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधला. यावेळी अनुराग ठाकूर यांनी नवमतदारांच्या प्रश्नांना उत्तर दिली. तर तरुणांना लोकशाही आणि मतदानाचे महत्व पटवून दिले.
भारताने लोकशाही राज्य व्यवस्था स्वीकारली आहे. या लोकशाहीत जनतेने मतदान करून आपला लोकप्रतिनिधी निवडून देणे आवश्यक असते. त्यासाठी मतदान हे लोकशाहीप्रति असलेले कर्तव्य बजावणे हे देशातीन प्रत्यके नागरिकास अनिवार्य असते. मात्र असे असले तरी देशात मतदानाचा टक्का देवसेंदिवस घसरताना दिसत आहे. खासकरून तरुण वर्ग हा मतदानासाठी निराश असल्याचं पाहिला मिळत. यासाठी युवकांशी संवाद साधने आवश्यक असते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून बाळा भेगडे आणि अनुराग ठाकूर यांनी मतदारसंघातील युवकांशी मुक्त संवाद साधला.
यावेळी अनुराग ठाकूर यांनी तरुणांच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली, यामध्ये तरुणांनी देखील चातुर्य दाखवत देशातील काही महत्वपूर्ण प्रश्नांना हात घेतला. बेरोजगारी, समान नागरी कायदा, आरक्षण, आदि विषयांवर प्रश्न विचारून अनुराग ठाकूर यांच्या कडून शंकेचे निरसन करून घेतले. देश आता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे विकासाच्या पायऱ्या चढत आहे. तसेच प्रलंबित प्रश्नही मार्गी लागत आहेत. गेली 60 वर्ष लढा देऊन कलम 370चा प्रश्न निकाली लागला आहे. त्याच प्रमाणे आता याच मोदी सरकारच्या काळात देखील युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात समान नागरी कायदा लवकरच मंजूर होणार आहे, असा विश्वास अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला.
दरम्यान केंद्रीय अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी पुण्यातील मावळ विधानसभेचा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण असेल याचा एकप्रकारे सूचक वक्तव्य केल. संजय उर्फ बाळा भेगडे हे आता राज्यमंत्री आहेत. मात्र पुढच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री असतील अशा प्रकारे एक सूचक वक्तव्य अनुराग ठाकूर यांनी पुण्यातील मावळ तालुक्यात व्यक्त केल आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1178941632835506176?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178938316739055616?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178929888314548224?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
