Share

राष्ट्रवादीमध्ये विरोधकांसोबत तडजोड करणारी मंडळी उरली नाहीत- बजरंग सोनवणे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा:- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला अजून एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या केजच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा स्व. गोपीनाथ मुंडेंच्या समाधी समोर पार पडला.याच पार्श्वभूमीवर बीड राष्ट्रवादी पक्षात विरोधकांसोबत तडजोड करणारी मंडळी उरली नाही याचा आनंद आहे,असे विधान करत राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे यांनी नमिता मुंदडा यांना टोला लगावला आहे.

तसेच ते म्हणाले , पवार साहेबांचं सदर कुटुंबियावर जास्त प्रेम होतं. त्यामुळे पवार साहेबांचा आदेश आमच्यासाठी महत्वाचा होता व तो आम्ही ईमानदारीने पाळणार होतोत. सदर कुटुंब आज शरीराने भाजपात गेले असले तरी स्थानिक स्वराज्य निवडणुकीवेळीच ते भाजपात गेले होते. त्यावेळीही त्यांनी तिकडेच मतदान केले होते. लोकसभेतही त्यांनी आम्हाला ब्लॅकमेल केले होते. असा ही आरोप बजरंग सोनवणे यांनी केला.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे बीडमध्ये आले असता त्यांनी बीडमधील उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यात परळीतून धनंजय मुंडे, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगावमधून प्रकाश सोळके, गेवराईतून विजयसिंह पंडित आणि केजमधून नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली होती. परंतु राष्ट्रवादीकडून उमेदवारी असतानाही नमिता मुंदडा यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.त्यामुळे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानाला जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1178655962283962368?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!