Share

महापालिका जिंकल्यानंतर छिंदम होवू पाहताय , अहमदनगरचे आमदार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा:- लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. अर्ज भरण्यास सुरवातदेखील झाली असून, येत्या २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. शुक्रवार (ता. २७)पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली असून अनेक नेत्यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले नगरसेवक श्रीपाद छिंदम आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. श्रीपाद छिंदम यांनी महाराष्ट्र विधानसभेची तयारी केली असून नगर जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे.मात्रश्रीपाद छिंदम हे कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र छिंदम नगर महापालिका निवडणूक ज्याप्रमाणे अपक्ष लढून जिंकून दाखवली होती, तसंच विधानसभेची निवडणूकही अपक्ष लढण्याची तयारी छिंदम यांची आहे.

दरम्यान श्रीपाद छिंदम यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत अश्लिल शब्द वापरुन आक्षेपार्ह विधान केले होते . त्यावेळी सर्वच स्तरातून छिंदम यांच्यावर टीका झाली होती.शिवप्रेमींनी छिंदम यांना चोपही दिला होता. सुरक्षेसाठी नगरमधून छिंदम यांना बाहेर हलवण्यात आले होते. मात्र, काही दिवस लोटल्यानंतर छिंदम पुन्हा राजकारणात सक्रीय आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1178605787062493184?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178612189734690816?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!