🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकामध्ये मतदारांच्या सोयीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने सी व्हीजील, व्होटर्स हेल्पलाइन आणि पीडब्ल्यूडी अॅप्स उपलब्ध करून दिले आहेत. आचारसंहितेचा भंग होत असेल तर याबाबतची माहिती नागरिकांनी निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवण्यासाठी निवडणूक आयोगाने सी व्हीजील या मोबाईल अॅपची निर्मिती केली आहे. हे अॅप्स आता चांगलाच प्रभावी ठरत असल्याच दिसून आल आहे.
या अॅप्सद्वारे नागरिक निवडणुकीच्या काळात खोट्या बातम्या, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड, मतदारांना पैसे देणे, मादक पदार्थांचे प्रलोभन किंवा वितरण, चिथावणीखोर भाषणे आदि बाबींची तक्रार करण्यासाठी सी व्हीजील अॅप्सचा वापर करता येऊ शकतो. आचारसंहितेचा भंग होत असेल तर नागरिक या अॅपद्वारे कॅमेरा, इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या स्मार्टफोनद्वारे तक्रार करू शकतात.
त्याचप्रमाणे दिव्यांगासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पीडब्ल्यूडी हे अॅप्स तयार केले आहे. या अॅप्सच्या माध्यमातून दिव्यांग घरबसल्या नोंदणी करणे, नवीन मतदार नोंदणी करणे, यादीतील नावाचे हस्तांतरण, नावात सुधारणा, नाव वगळणे, व्हीलचेअर साठी मागणी करणे, मतदान केंद्र शोधणे, इ. कामे या अॅप्सच्या माध्यमातून करता येणार आहेत. तर व्होटर्स अपच्या माध्यमातून मतदान यादीतील नाव शोधणे, मतदान,निवणूक, इव्हीएम, निकाल, यासंदर्भातील शंकानिरसन, उमेदवाराची माहिती, निवडणुकांचे वेळापत्रक, आदि माहिती या अॅप्सच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1178284724592099335?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178284169681522688?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178278984359899138?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
