🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष चांगलेच तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला मोठा झटका बसणार आहे.
कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी भाजपच्या संपर्कात असल्यामुळे काँग्रेसने आपल्या सहा आमदारांना विधानसभेच्या निवडणुकीचे तिकीट न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे सहाही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या आमदारांनी साथ सोडल्याने कॉंग्रेसची अवस्था अजूनचं बिकट झालेली आहे.
या सहा आमदारांमध्ये अस्लम शेख, राहुल बोंद्रे, काशिराम पावरा, डी. एस. अहिरे, सिद्धराम मेहेत्रे, भारत भालके यांचा समावेश आहे. हे सर्वजण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेसला पक्षांतराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. माजी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी भाजपात प्रवेश केला तसेच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने मोठा धक्का बसला होता.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1178278984359899138?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178278432867680256?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178271778805694466?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
