Share

या रथातून निघणार ‘दगडूशेठ’ गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक

Published On: 

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला मंगळवार, दिनांक ५ सप्टेंबर रोजी थाटात निघणार आहे. यंदा धुम्रवर्ण रथामध्ये दगडूशेठ चे गणपती बाप्पा विराजमान होणार असून मोतिया रंगांच्या लाखो दिव्यांनी हा रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

धुम्रवर्ण रथावर ८ खांब असून आकर्षक नक्षीकाम असलेल्या ४ कमानी उभारण्यात आल्या आहेत. रथाचा आकार १५ बाय १५ फूट असून उंची २२ फूट इतकी आहे. रथावर रेखीव रंगीबेरंगी कोरीवकाम असलेले ५ कळस बसविण्यात आले आहेत. संपूर्ण रथावर ३६ आकर्षक झुंबर लावण्यात आली असून हे रथाचे वैशिष्टय असणार आहे. धूम्रवर्ण रथ शिल्पकार विवेक खटावकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला असून रंगकाम सुनील प्रजापती, लाईटस् वायकर बंधू, मारणे इलेक्ट्रिकल्स यांनी सलग १५ दिवसांच्या तयारीनंतर केले आहे.

सांगता मिरवणुकीबाबत माहिती देताना अशोक गोडसे म्हणाले, शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्यानिमित्त मिरवणुकीच्या अग्रभागी पर्यावरण रथ असणार आहे. त्यामध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे फलक लावण्यात येणार असून याद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच विनायक देवळणकर यांचा नगारा, दरबार बँड, प्रभात बँड आणि स्वरुपवर्धिनी पथक मिरवणुकीत सहभागी होणार आहे. याशिवाय पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठया संख्येने सहभागी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!