Share

विधानसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजण्याची शक्यता ?

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा:- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आज आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. कारण आज संध्याकाळी निवडणूक आयोग पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती  समोर येत आहे . या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या संदर्भात एका मराठी वाहिनेने वृत्त दिले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय दौरे, मोर्चेबांधणी गाठीभेटी अशा घडामोडींना वेग आला असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुगलबंदी पाहिला मिळत आहे.निवडणूक तारखांची घोषणा झाल्यानंतर तर आरोप-प्रत्यारोपांचा स्वर टिपेला पोहचणार आहे. त्यामुळे आज निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन विधानसभेच्या तारखांची घोषणा करणार का, याकडे राजकीय पक्षांसह सर्वसामान्यांचंही लक्ष लागलं आहे.

दरम्यान बुधवारी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी बैठक घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका दिवाळीच्या अगोदरच घ्याव्या म्हणून राजकीय पक्षांची मागणी आहे याबद्दल निवडणूक आयोग विचार करत आहे, असं सुनील अरोरा यांनी सांगितले होते.परंतु आज संध्याकाळी विधानसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजण्याची शक्यता आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!