Share

‘मिशन विधानसभा 2019’साठी मुख्यमंत्र्यांकडून खासदार काकडेंवर विशेष जबाबदारी?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता सुरू झाला आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष आता जोरदार तयारीला लागलं आहे. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू असलेली महाजनादेश यात्रा पुण्यात येत असून त्याच्या नियोजन व तयारीसाठी भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे चांगलेच सक्रिय झालेले दिसत आहेत. पुणे शहर भाजपाच्या वतीने आयोजित महत्वपूर्ण बैठकीत खासदार काकडे यांनी जबाबदारी घेत महाजनादेश यात्रेच्या नियोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेतली.

लोकसभा निवडणुकीत खरेतर संजय काकडे पुण्यातून इच्छुक होते. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दानंतर त्यांनी आपली तलवार म्यान केली. त्यानंतर राजकीय दृष्ट्या खासदार काकडे शांत होते. मुख्यमंत्री फडणवीस स्वतःच आपल्याबद्दल निर्णय घेतील व तो मान्य करून मी पक्षाचे काम करेल असं अनेकदा खासदार काकडे यांनी सांगितले आहे. परवा मुख्यमंत्री फडणवीस पुण्यात मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी आले होते. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात लोहगाव विमानतळापासून ते शेवटपर्यंत खासदार संजय काकडे मुख्यमंत्री फडणवीसांसोबत त्यांच्या गाडीतच होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासदार काकडे यांच्या घरी जाऊन गणपतीची आरती केली.

महाजनादेश यात्रेच्या नियोजनानिमित्त पुणे शहर भाजपाच्या वतीने आयोजित महत्वपूर्ण बैठकीलाही खासदार गिरीश बापट गैरहजर होते. यावेळी खासदार संजय काकडे यांनी या बैठकीची सूत्रे हाती घेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली येत असलेल्या महाजनादेश यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पक्षाचे सर्व आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!