🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेड मतदारसंघातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. या मतदारसंघातील दोन्ही उमेदवार बरोबरीचे असल्याने या विधानसभेला कर्जत जामखेडमध्ये हाय-व्होल्टेज लढत पाहिला मिळणार आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे उतरणार आहेत. तर त्यांना आव्हान देण्यासाठी भाजपचे विद्यमान मंत्री राम शिंदे असणार आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी मतदार संघात प्रचाराचा धडाका लावला आहे. मात्र अशातच भाजपला मोठा धक्का बसणार आहे. कारण राम शिंदे यांचे खंदे समर्थक माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत बंडाच्या तयारीत आहेत.
नामदेव राऊत यांचा कर्जत तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे. मात्र नामदेव राऊत हे बंडाच्या तयारीत आहेत. या पार्श्ववभूमीवर नामदेव राऊत यांनी सोमवारी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. तसेच नामदेव राऊत यांनी कर्जत-जामखेड विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राम शिंदे अडचणीत येणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान रोहित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याने कर्जत जामखेडच्या राष्ट्रवादीच्या नेत्या मंजुषा गुंड याही बंडखोरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राम शिंदेंप्रमाणे रोहित पवार ही अडचणीत येणार आहेत. त्यामुळे कर्जत जामखेडची लढाई ही अत्यंत रंगतदार होणार आहे.
- ‘सालकऱ्याचा मुलगा निवडायचा की मालक तुम्हीच ठरवा’ राम शिंदेंचे भावनिक आवाहन
- कोकणात राष्ट्रवादीला खिंडार, ‘या’ नेत्याचा शिवसेना प्रवेश झाला निश्चित
- राष्ट्रवादीच्या जेष्ठ आमदाराने बोलावली कार्यकर्त्यांची बैठक, लवकरच भाजपात प्रवेश करणार ?
- ‘एमआयएमच्या उमेदवारीसाठी भाजप-सेनेचे नेते मला भेटतात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
