टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. सर्वच पक्षांनी जनसंपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपची महाजनादेश यात्रा सुरु आहे. या यात्रेचा दुसरा टप्पा नुकताच संपला आहे.
या यात्रेतील नांदेड येथील सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली होती. त्यांनी ‘या लोकसभा निवडणुकीत नांदेडने एक नवा इतिहास तयार केला आहे. अशोकाचं झाड उंचच उंच वाढतं. त्याची सावली कोणाला मिळत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही नवी सावली या ठिकाणी शोधलेली आहे. एक नवा इतिहास तुम्ही केलेला आहे असं विधान केले होते.
या टीकेला अशोल चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी फडणवीसांनी महाराष्ट्राला कोणती सावली दिली हे सांगावं. त्यांच्या काळात राज्यात फक्त नैराश्याची काळी छाया पसरली. पाच वर्षांत त्यांनी काय दिवे लावले हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे असं विधान करत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे.
पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचा उपयोग नांदेडमधील गुन्हेगारांना अटक करण्यासाठी केला असता, तर जनतेने त्यांचं अधिक कौतुक केलं असतं. नांदेडमध्ये डॉक्टरांकडून खंडणी गोळा करणारे कुख्यात गुन्हेगार आहेत. कोकुलवार यांच्यावर गोळीबार झाला. ते अपंग झाले आहेत पुन्हा त्यांच्या मुलाला धमकी देण्यात आली आहे. यांच्या मागे मुख्यमंत्र्यांचा हात असल्याच त्यांनी म्हटले आहे.
- पुढच्या वर्षीही ‘वर्षा’वरच करणार गणपतीची प्राणप्रतिष्ठा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- ‘जिना यहां, मरना यहां’; जिवंत आहे तोपर्यंत भाजपचे काम करणार
- तुम्हाला रसायनांचा विकास हवा आहे की आम्ही केलेला विकास पाहिजे ? – सुळे
- ‘भाजपमध्ये मेगाभरती नाही, ठराविक नेत्यांनाचं प्रवेश दिला जातोय’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
