Share

पुढच्या वर्षीही ‘वर्षा’वरच करणार गणपतीची प्राणप्रतिष्ठा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा-मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहपरिवार गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी पत्नी अमृता फडणवीस, मुलगी आणि कुटुंबियांसोबत मुख्यमंत्र्यांनी बाप्पाची आरती केली. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजनदेखील सहकुटुंब उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यावरील पुराचं संकट दूर करो, पीडितांना दिलासा मिळण्यासाठी बाप्पाचरणी प्रार्थना केली. शिवाय, पुढच्या वर्षीसुद्धा शासकीय निवासस्थानी आपणच बाप्पाची प्रतिष्ठापना करणार असल्याचं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

तसेच फडणवीस पुढे म्हणाले, गणेश पर्व अत्यंत आनंदाचं पर्व आहे. देशात-विदेशात हा सण साजरा केल्या जातो. मात्र मराठी माणूस जिथं असतो तिथं या सणाचा उत्साह वेगळाच असतो. गणरायाला एवढीच प्रार्थना की सर्वांना आशीर्वाद द्यावा. महाराष्ट्रावरील संकट दूर करण्यासाठी आणि पूर पीडितांना दिलासा मिळावा यासाठी प्रार्थना करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. बाप्पांचा आशीर्वाद कायमच माझ्या पाठीशी राहिला आहे. त्यामुळे स्वतःसाठी काही मागण्याची वेळच आली नाही, असेही फडणवीस म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!