टीम महाराष्ट्र देशा: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत. मंगलदास बांदल यांनी शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी बंद खोलीत तासभर चर्चा केली. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करणार तर नाही ना अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
या भेटीविषयी बोलताना बांदल यांनी आमच्या दोघांमध्ये वेगळ्या कारणाने चर्चा झाली असून शरद पवार साहेबांनी मला विधानसभेच्या उमेदवारीबाबत शब्द दिलेला आहे. त्यामुळे पवार यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे असं बांदल यांनी सांगितले. तसेच त्यांनी माझी केवळ शिवाजीराव आढळराव यांच्याशीच नाही तर माझी मुख्यमंत्र्यांसोबत देखील अर्धा तास बातचीत झालेली असं विधान केले आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरामुळे राष्ट्रवादीला सगळ्यात जास्त नुकसान झाले आहे. अनेक नेत्यांनी पवारांची साथ सोडली आहे. त्यात वैभव पिचड, रश्मी बागल, दिलीप सोपल, राणा जगजितसिंह पाटील, धनंजय महाडिक यांच्यासह अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.
- अशोकाचं झाड उंच वाढतं, त्याची सावली कोणाला मिळत नाही; मुख्यमंत्र्यांचा चव्हाणांना टोला
- राष्ट्रवादीला भगदाड; विविध पदांवरील ५० नेते सोडणार पवारांची साथ
- ‘निलंगा विधानसभा मतदारसंघ हा कोणत्याही पक्षाची जहागिरी नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

