Share

१३ तारखेला लागणार विधानसभेची आचारसंहिता, रावसाहेब दानवेंच भाकीत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: भाजपचे माजी अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विधानसभा निवडणुकीचे भाकीत केले आहे. जालना येथील कार्यक्रमात बोलताना दानवे यांनी विधानसभेची आचारसंहिता १३ तारखेला लागणार असल्याचं जाहीर करून टाकल आहे. जालन्यात ओबीसी समाजाच्या कार्यक्रमात संवाद साधताना दानवेंनी ही माहिती दिली.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन दिवसांपूर्वी १२ तारखेला आचारसंहिता लागणार असून १५ ऑक्टोबरला मतदान असेल, असं दोनच दिवसांपूर्वी सांगितलं होतं. आता दानवे यांनी देखील नवे भाकीत व्यक्त केले आहे. दरम्यान, राजकीय जाणकारांकडून १२  तारखेला अनंतचतुर्दशी झाल्यानंतर १३  सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करेल, असं बोलले जात आहे.

अमित शाह आज सोलापूरमध्ये; ‘हे’ दिग्गज करणार भाजपमध्ये प्रवेश

आज सोलापूरमध्ये महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता होणार आहे. यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष सोलापूरमध्ये सभा घेणार आहेत. यासभेत अमित शहांच्या उपस्थित कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपप्रवेश करणार आहेत. राणा जगजीतसिंह पाटील, पद्मसिंह पाटील यांच्यासह आमदार बबन शिंदे, जयकुमार गोरे, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक, रामराजे नाईक यांचाही भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!