🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा:- लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते मंडळी पक्षांतर करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की राणेंना भाजप मध्ये प्रवेश दायचा की नाही यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंची समजूत काढू आणि नंतरच ठरवू की राणेंना पक्षात प्रवेश दायचा की नाही. कारण भाजपचे धोरण हे सगळ्यांना पुढे घेवून जाणारे आहे. त्यामुळे मित्र पक्षांचा विचार घेवूनच राणे बाबत निर्णय घेण्यात येईल .
दरम्यान स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेले दीड-दोन महिने सुरू आहे; मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाचा गुंता अजूनही कायम आहे. त्यामुळे ते कधी भाजप मध्ये प्रवेश करणार याची चर्चा माध्यमात रंगली आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून राणेंना लवकरच भाजप प्रवेशाचा ग्रीन सिग्नल मिळू शकतो.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
