Share

छगन भुजबळ यांनी रिपब्लिकन पक्षात यावे – रामदास आठवले

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. यावर रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदार आठवले यांनी भ्ष्य केले आहे. त्यांनी ‘माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून महायुतीमध्ये येणार असतील तर त्यांच्या सारख्या ओबीसी समाजाच्या वरिष्ठ नेत्याचे स्वागत केले पाहिजे असं विधान केले आहे.

तसेच पुढे बोलताना ‘छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस सोडायची असेल आणि शिवसेनेत त्यांचा प्रवेश होत नसेल तर त्यांनी महायुतीचा घटक पक्ष रिपब्लिकन पक्षात यावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. रामदास आठवले हे अहमदनगरच्या दौऱ्यावर आले असता राधाकृष्ण विखे पाटिल यांची सांत्वनपर भेट घेतली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना आठवलेंनी छगन भुजबळ यांना रिपब्लिकन पक्षात येण्याची ऑफर केली.

दरम्यान, पक्षांतरामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीतून वैभव पिचड, चित्रा वाघ, गणेश नाईक, दिलीप सोपल यांच्यासह अनेक नेते राष्ट्रवादीतून बाहेर पडले आहेत. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील नेते राणा जगजितसिंह पाटील हे पक्ष सोडणार आहेत. तसेच कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक हेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!