टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मंडळी राजकीय पक्षात प्रवेश करीत आहेत. भाजपमध्ये मेगाभरती सुरु असून त्यापाठोपाठ सेनेत प्रवेश करण्यासाठी देखील अनेकजण इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय दत्त राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.
मुंबईत झालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या महामेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता त्यांनी ‘अभिनेता संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार होता. पण तारीखेत झालेल्या गोंधळामुळे तूर्तास त्यांचा प्रवेश झाला नाही. पक्षप्रवेशासाठी संजय दत्त यांना २५ ऑगस्ट तारीख मागितली होती पण त्यांनी चुकून २५ सप्टेंबर तारीख नोंद केली. त्यामुळे ते आज परदेशात आहे. पण पुढच्या काळात ते पक्षात प्रवेश करतील असं विधान केल होते.
या सर्व प्रकरणावरून महादेव जानकार यांनी घुमजाव केले आहे. अभिनेता संजय दत्त राष्ट्रीय समाज पक्ष (रासप)मध्ये प्रवेश करणार असल्याचे मी कधीच म्हटलं नव्हतं, असे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्पष्ट केले आहे. संजय दत्त रासपामध्ये प्रवेश करणार नाहीत. प्रसारमाध्यमांत आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत. संजय दत्त रासपात प्रवेश करणार नाहीत असं जानकार यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच पुढे बोलताना त्यांनी संजय दत्त पक्षात प्रवेश करणार नसले तरी इतर पक्षाचा जसा प्रचार करतात तसाच ते रासपाचा प्रचार करणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत माझ्या पक्षाचा प्रचार करणार असल्याचे संजय दत्त यांनी मला आश्वासन दिले आहे असं जानकर यांनी स्पष्ट केले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
